Upcoming IPO : सरत्या वर्षाला निरोप देताना शेअर बाजारातील प्राथमिक बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडणार आहेत. डिसेंबरच्या या शेवटच्या आठवड्यात एकूण ११ नवीन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होत आहेत. यामध्ये एका मुख्य कंपनीसह १० लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. आयपीओ मार्केटमधील या 'मेगा' आठवड्यामुळे गुंतवणूकदारांना वर्षअखेरीस नफा कमावण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
'गुजरात किडनी'चा आयपीओ
या आठवड्यात 'मेनबोर्ड' सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांचे लक्ष 'गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटी' या रुग्णालय साखळीकडे असेल. हा इश्यू सोमवार, २२ डिसेंबरला उघडेल आणि बुधवारी २४ डिसेंबरला बंद होईल. कंपनी या माध्यमातून २५१ कोटी रुपये उभे करणार आहे. प्रति शेअर किंमत १०८ ते ११४ रुपये निश्चित करण्यात आली आहे.
लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील आयपीओंचा पाऊस
छोट्या आणि मध्यम कंपन्यांच्या आयपीओमध्ये या आठवड्यात मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. एकूण १० एसएमई कंपन्या आपले नशीब अजमावणार आहेत.
२२ ते २४ डिसेंबर दरम्यान
संड्रेक्स ऑईल
श्याम धानी इंडस्ट्रीज
दाचेपल्ली पब्लिशर्स
ईपीडब्ल्यू इंडिया
२३ ते २६ डिसेंबर दरम्यान
अपोलो टेक्नो इंडस्ट्रीज
बाई काकाजी पॉलिमर्स
ॲडमॅच सिस्टम्स
नांटा टेक
धारा रेल प्रोजेक्ट्स
२६ डिसेंबर : ई टू ई ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर
नवीन लिस्टिंग्सचीही रेलचेल
केवळ नवीन आयपीओच नाही, तर गेल्या आठवड्यात फाईल कंपन्यांची शेअर बाजारात एन्ट्रीही या आठवड्यात होणार आहे.
- केएसएच इंटरनॅशनल : २३ डिसेंबर (मेनबोर्ड)
- नेपच्यून लॉजिटेक : २२ डिसेंबर (SME)
- ग्लोबल ओशन लॉजिस्टिक्स : २४ डिसेंबर (SME)
- फायटोकेम रेमेडीज : २६ डिसेंबर (SME)
छोट्या आणि मध्यम आयपीओमध्ये परतावा मोठा मिळत असला तरी त्यातील जोखीमही जास्त असते. त्यामुळे कोणत्याही कंपनीत पैसे लावण्यापूर्वी तिचे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस नीट वाचावे आणि कंपनीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्यावा.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
